प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : विविध नागरी प्रश्नांनी त्रासलेल्या नागरिकांना काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या पदयात्रेत झालेल्या भेटीमुळे आधार मिळाल्याचे दिसून आले. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांची पदयात्रा शुक्रवारी सायंकाळी दिप बंगला चौकातून निघाली. ‘काम करणारा कार्यकर्ता’ अशी प्रतिमा असल्यामुळेच आम्ही आमचे प्रश्न तुम्हाला सांगत आहोत अशा भावना पदयात्रेच्या मार्गावर जागोजागी नागरिकांनी व्यक्त केल्या. धंगेकर निवडून आले तर हे प्रश्न सुटतील असा आशावादही व्यक्त करीत होते.
या पदयात्रेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष आणि आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राजकीय पक्ष्यांचे झेंडे, ढोली बाजा व हलगी, फटाके घोषणा यामुळे वातावरण निवडणूकमय झाले होते. ठिकठिकाणी नागरीक, व्यापारी व गणेश मंडळे धंगेकरांचे स्वागत करून निवडून येण्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद देत होते. अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण केले दिप बंगला चौकातून निघालेली ही पदयात्रा पी. एम.सी. कॉलनी, वेताळबाबा चौक, कुसाळकर पुतळा चौक, जनता वसाहत, वीर सावरकर चौक, गोखलेनगर चाळ, पत्रकार नगर मार्गे हनुमान नगर येथे समाप्त झाली.
वडारवाडी भागात पदयात्रा आली असताना अनेक जण त्यातही विशेषतः गृहिणी पाण्याबाबत तक्रारी करून हे प्रश्न सोडवण्याची विनंती धंगेकरांना करीत होते. ‘कधी पाणी येतच नाही, आले तर कमी दाबाने अपुरे, पाणी येण्याची वेळाही निश्चित नाही.’ हे सारे प्रश्न ऐकल्यावर धंगेकरांनी खात्री दिली की, निवडणुकी नंतर संबंधित विभाग अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न मी सोडवेन हा माझा शब्द आहे,’ असे धंगेकरांनी आश्वासित करताच नागरिकांनी टाळ्यांचा कडकडात केला. ‘घरोघरी शिकलेली तरुण मुल आहेत पण त्यांना नोकरी व्यवसाय नाही, या प्रश्ना बरोबरच या भागात शाळा प्रवेशांची मोठी समस्या असल्याचेही नागरिकांनी सांगितले. यावरही धंगेकरांनी नागरिकांना आश्वस्त केले.
रात्री १० पर्यंत चालणाऱ्या या पदयात्रेत काँग्रेस माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी नगरसेवक दत्ता बहिरट, माजी नगरसेवक दत्ता गायकवाड, खाडकी कॅन्टॉन्मेंटचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे, सरचिटणीस विनोद रणपिसे, शिवाजीनगर ब्लॉक अध्यक्ष अजित जाधव, अंजनेय साठे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आनंद मंजळकर, उमेश वाघ, प्रविण डोंगरे, राजन नायर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजू साने, जावेद निलगर, संजय मोरे, भारत पवार, गणेश गुगळे, वाहिद निलगर, राजू धोत्रे, राकेश जाधव, दत्ता मांजरेकर, राजू मांजरे, नारायण पाटोळे, संजय मोरे, संदीप मोरे, प्रसन्ना मोरे, विक्रांत धोत्रे, राहुल गोंजारी, आशुतोष जाधव, रोहित बहिरट, बाबा सय्यद, सचिन बहिरट, राजश्री अडसूळ, रूपटक्के ताई, पौर्णिमा भगत, सुभाष काळे, अविनाश बहिरट, फय्याज शेख, भाऊ गोरडे, गोपी पवार, महेंद्र पवार इत्यादी सहभागी झाले होते.
अरविंद शिंदे अध्यक्ष
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी
९८२२०२०००५