‘आमचे नागरी प्रश्न सोडवा’ वडगाव शेरीत नागरिकांची धंगेकरांकडे मागणी

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांची पदयात्रा आज वडगाव शेरी प्रभाग क्र २ परिसरात झाली. विशेष म्हणजे या पदयात्रेत शेकडो नागरिक भेटत असताना त्या भागातील ट्राफिक, पाणी पुरवठा, ड्रेनेज समस्या यांबद्दलच्या तक्रारी नागरिक धंगेकरांकडे करीत होते. 

नागरिकांच्या विविध समस्यांमध्ये विश्रांतवाडी चौक, जेल रोड आणि टिंगरे नगर एअर पोर्ट रोड यातील वाहतूक कोंडी बाबत जास्त तक्रारी होत्या तसेच संपूर्ण वडगाव शेरीत कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा तसेच जुनाट झालेली ड्रेनेज सिस्टिम याबाबतच्या तक्रारी जास्त होत्या. नागरिकांचे हे सर्व प्रश्न धंगेकरांनी नीट ऐकून घेऊन सोबतच्या कार्यकर्त्यास लिहून घायायला सांगितले व या सर्व कामांचा मी १००% पाठपुरावा करेन व प्रश्न सोडवेन असा नागरिकांना विश्वास दिला. 

गुरुवारी वडगाव शेरी मतदार संघात सायंकाळी ६ ते रात्री १० यावेळी झालेल्या भव्य पदयात्रेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष आणि आम आदमी पार्टी यांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक असे ४०० हून अधिक पदयात्रेत सहभागी झाले होते. प्रारंभी असणारा ढोल – ताशा, पदयात्रेतील सर्व पक्षांचे फडकणारे झेंडे, हाताच्या पंजाच्या प्रतिकृती, फटाक्यांचा डणडणाट आणि जिंदाबादच्या घोषणांसह चाललेल्या पदयात्रेत महिलांची संख्या लक्षणीय होती. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेली ही पदयात्रा विविध सोसायट्या, इंदिरानगर, मेंटल कॉर्नर परिसर, कस्तुरबा सोसायटी मार्गे जाऊन आदर्श नगर परिसरात समाप्त झाली. 

या पदयात्रेत उमेदवार रवींद्र धंगेकर यांसमवेत वडगाव शेरी ब्लॉक अध्यक्ष राजू ठोंबरे, येरवडा ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट, वडगाव शेरी महिला ब्लॉक अध्यक्ष शिवानी माने, माजी नगरसेवक सुनिल मलके, माजी नगरसेवक राजेंद्र शिरसाट, माजी नगरसेवक पप्पू भोगले, माजी नगरसेवक संगीता देवकर, रमाकांत साठे, राकेश कुशवाह, डॅनियल मगर, प्रभाग २ वडगाव शेरी चे उपाध्यक्ष सचिन भोसले, विल्सन संदेवळ, योगेश शिर्के आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

अरविंद शिंदे अध्यक्ष 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी 

९८२२०२०००५

Post a Comment

Previous Post Next Post