प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने प्रकाशित केलेले संकल्पपत्र हे भाजप परंपरेतील फसवणूक पत्रच आहे असे स्पष्ट दिसून येते. कारण गेली १० वर्षे केंद्रात व राज्यात भाजप सत्तेवर आहे. तसेच पुण्यात भाजपचे महानगरपालिकेत १०० नगरसेवक, ६ आमदार आणि १ खासदार असूनही पुण्याचा विकास ठप्प झाला, स्मार्ट सिटी योजना फसली, मेट्रो प्रकल्प किलोमीटरऐवजी इंच-इंचाने पुढे सरकत आहे, नदी सुधार प्रकल्पात प्रगती शून्य आहे, ट्रॅफिक समस्या अधिक जटिल झाली आहे. हे व असे अनेक प्रश्न सत्ता असूनही भाजपने सोडवले नाही आणि या नव्या संकल्पपत्रात मात्र ‘काय करणार’ याची जंत्री दिली आहे. पुणेकरांचा त्यामुळेच भाजपाच्या या संकल्पपत्रावर विश्वास बसणार नाही हे निश्चित.
काँग्रेस पक्षाने पुण्याचा सर्वांगीण चौफेर विकास केला, नव्या चांगल्या रोजगारांच्या संधी निर्माण केल्या. असे काहीही भाजपने संधी असूनही केले नाही. कारण पुण्याचा विकास करण्याची क्षमता, जिद्द, दूरदृष्टी आणि धमक त्यांच्यात नाही. त्यामुळेच भाजपचे आताचे संकल्पपत्र म्हणजे ‘फसवानामा’ आहे.
- मोहन जोशी
उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख
९८२२०९६७२०