प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : मावळ शिरुर सह अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिक रांगेत उभे असल्याचं दिसून आलं. तर वडगाव शेरी परिसरातील इंटरनॅशनल स्कूल मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. त्यामुळे काही वेळासाठी मतदान थांबवण्यात आलं आहेत. ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने मतदान बंद ठेवावं लागलं या मुळे नागरिकांना रांगेत थांबावं लागलं.
यातील एका खोलीमधील मतदान सुरू असलं तरी सुद्धा दुसऱ्या खोलीत मात्र मशीन बंद पडल्यामुळे मतदान थांबवण्यात आलंआहे. प्रशासनाकडून मशीन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तळेगाव दाभाडे येथील गणेश वाचनालयातील मतदान तांत्रिक अडचणीमुळे काही वेळासाठी बंद पडले होते. यावेळी नागरिकांना रांगेत उभं रहावं लागलं. मात्र कर्मचारी आणि प्रशासनाने लगेच कामाला लागते आणि त्यांनी मशीन दुरुस्त केलं. बियुमध्ये दोनदा तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण युनिट बदलावे लागले. त्यामुळे काही काळ मतदान बंद होते. आता मतदान सुरळीत सुरू झाले आहे.