प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सर्व भाषा समाजवादाची आहे. ते ज्या वेळी समाजवादाची भाषा बोलू लागले आहेत तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पराभवाची भिती वाटू लागली आहे. त्यामुळे ते द्वेष पसरवणारी भाषा बोलू लागले आहेत. या भाषेमुळे देशाच्या एकात्मतेला व प्रतिमेला धक्का बसत असून निवडणुक आयोग काहीच कारवाई करत नाही, अशी टीका सोशंलिस्ट पार्टीचे नेते व आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य यांनी केली.
पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. वैद्य बोलत होते. यावेळी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, पुणे लोकसभा प्रचार प्रमुख माजी आमदार मोहन जोशी, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी उपस्थित होते.
डॉ. अभिजीत वैद्य म्हणाले, अर्थ संकल्राक आरोग्यासाठी साडेपाच टक्के तरतूद असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडीच टक्क्याच्यावर तरतूद केली नाही. आयुष्यमान भारत कार्ड नेमकं कुठे चालते, हे कळतच नाही. कोवीडमधील मृत्यूंची संख्या दाबून ठेवली. प्रत्येकाच्या जवळची एक तरी व्यक्ती कोवीडमध्ये गमावली आहे. मोदींना समाज व्यवस्था सुधरवायचीच नाही. नवीन शिक्षण धोरण हे मुवाद आहे. मोदींनी देशाच्या संस्कृतीला काळीमा फासला असून या निवडणुकीत देशातील जनतेचे शहाणपण बाहेर पडेल आणि मोदींचा पराभव होईल. जर काही लबाड्या केल्या नाहीत तर भाजपचा आकडा दीडशेच्या आत राहील. पुण्यातही भाजपचा दारून पराभव होईल.
पुण्यात समाजवादाची परंपरा आहे. हे पुणे मनुवादाला झिडकारून पुणेकर महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकरांना निवडून देतील, असा विश्वासही डॉ. वैद्य यांनी व्यक्त केला.
अरविंद शिंदे
अध्यक्ष
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी
९८२२०२०००५