राज्यातील पहिले क्रीडा विद्यापीठ सत्ताधार्‍यांमुळे रखडले - माजी क्रीडा मंत्री सुनिल केदार यांचा आरोप



प्रेस मीडिया लाईव्ह :

मी विदर्भातील असूनही पुण्यात राज्यातील पहिले क्रीडा विद्यापीठ होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. सर्व मान्यता घेवून केवळ वर्ग सुरू करणे बाकी असताना राज्यातील सरकार बदलले आणि क्रीडा विद्यापीठाचा प्रवास थांबला. हे क्रीडा विद्यापीठ रखडण्यास केवळ ससत्ताधारी जबाबदार आहेत, असा आरोप माजी क्रीडा मंत्री सुनिल केदार यांनी केला.

पुणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी व इंडिया प्रंटचे काँग्रेसचे  उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केदार बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी, महारष्ट्र प्रदेश एन एस यू आय अध्यक्ष अमीर शेख, प्रसार माध्यम समन्वयक राज अंबिके उपस्थित होते.

केदार म्हणाले, मी क्रीडामंत्री असताना बालेवाडी येथील क्रिडानगरीत क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. विदर्भातील असतानाही मी पुण्यात क्रीडा विद्यापीठ उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी माझ्यावर आरोप झाले. युजीसीकडून मास्टर्स, डीग्री कोर्सेस मंजूर करून आणले. यावर तज्ञ नियुक्ती केली. इमारती आणि पायाभुत सुविधा बालेवाडी येथे असल्याने केवळ वर्ग सुरू होणे बाकी होते. असे असताना राज्यातील सरकार बदलले. तेव्हापासून आजपर्यंत या विद्यापीठाची फाईल कुठे अडकली काहीच माहिती नाही. विकासाच्या गप्पा मारणार्‍या भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विद्यापीठाला खोडा घालण्याचे काम केले आहे. राज्यातील नवीन पिढीचे नुकसान झाले.

माझ्याकडे क्रीडा विभागासह पशुसंवर्धन विभागही होता. शेळीपालन व मेंढी पालन उद्योगाला प्रोत्साहन दिले. आपल्या कडे 25 किलो वजन असते शेळीचे. शेळीचे वजन वाढावे यासाठी दमास्कस या शेळीची ब्रीड येथे क्रॉस ब्रीड करण्यासाठी परवानगी घेतली. नागपूरच्या प्रयोग शाळेत तसे प्रयोग ही करण्यात आला. परंतु आमचे सरकार गेले आणि ही योजना सरकारने बंद करून टाकली.  सत्ताधार्‍यांनी क्रिडा विद्यापीठाची गरज आहे की नाही हे सांगावे.

विद्यापीठ निर्णण करणे, हा विकास नाही का ? सत्ताधार्यांनी नवीन पिढीचे नुकसान का केले याचे उत्तर द्यावे, असेही केदार म्हणाले.

अरविंद शिंदे 

अध्यक्ष 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी 

९८२२०२०००५

Post a Comment

Previous Post Next Post