प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांना विविध संस्था संघटनांनी पाठिबा जाहीर केला आहे. तशा आशयाची पत्रके त्यांनी दिली आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( कांबळे )गटाच्या वतीने केंद्रीय सेक्रेटरी एच. बी. जाधव यांनी श्री. रवींद्र धंगेकर यांना दिलेल्या पाठिंब्याच्या पत्रात म्हंटले आहे की, देशातील संसदीय लोकशाही पद्धती संपवून अध्यक्षीय पद्धत आणण्याचा भाजपचा प्रयत्न असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्य घटनेतही बदल करण्याच्या दृष्टीने त्यांची धोरणे स्पष्ट दिसून येत आहेत. याला विरोध म्हणून काँग्रेस उमेदवार विजयी व्हावेत यासाठी आम्ही पाठींबा देत आहोत तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( कांबळे ) गटाचे सर्व कार्यकर्ते रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करतील असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र कामगार महामंडळ, सफाई सेवा सहकारी संस्था मर्यादित आणि दलित पँथर कामगार संघटना यांच्या वतीने अध्यक्ष सतीश वाघेला यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार यांना जाहीर पाठींबा दिला आहे. संस्थेच्या ३००० हून अधिक नोंदणीकृत सदस्य व त्यांचे कुटुंबीय रवींद्र धंगेकर यांना भरघोस मतांनी निवडून आणतील असे पत्रात म्हंटले आहे.
अरविंद शिंदे अध्यक्ष
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी
९८२२०२०००५