सध्याची लोकसभा निवडणूक पाहता मुस्लिम समाजातील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते आत्मचिंतन करतील का ?

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

= मुस्लिम मतदारा समोर एकीकडे आड आहे तर दुसरी कडे विहीर !! मुस्लीम समाजाची आपल्या मतदानाचा हक्क बजाऊन देखील परवड होत आहे का ? असे सध्या लोकसभेच्या निवडणूकीत दिसून आले आहे. महाराष्ट्र राज्य हा देशात खासदार संख्येत दुसऱ्या क्रंमाकावर आहे. एम आय एम , वंचीत वगळता प्रमूख राजकिय पक्षाने मुस्लीम समाजास उमेदवारी दिली नाही की ? की राज्यात एकही उमेदवार खासदरीकी च्या पात्रतेचा नाही , हे सुद्धा मुस्लिम समाजास विचार करण्याची गरज वाटत नाही का?

महाराष्ट्रान मुस्लिम समाजातील अब्दूल रहमान अंतुले या नेत्याला मुख्यमंत्री केल पण २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत राज्यात प्रमूख पक्षान एकाही  मुस्लिम उमेदवार दिलेला नाही . मुस्लीमांना लोकसंख्येच्या तुलनेत प्रतिनिधीत्व मिळाल का ? 2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्राच्या एकुन लोकसंख्ये पैकी ११.५४ टक्के मुस्लीम आहेत इथल्या मुस्लिम नागरिकांची संख्या  साधारन १.३० कोटी आहे. त्यात उत्तर कोकण, खानदेश, मराठवाडा आणि पच्छिम विदर्भात मुस्लिम मतदार दिसून येतात. मतदार संघाचा विचार केला तर धुळे, छत्रपती संभाजी नगर, मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघ भिवंडी, नांदेड, परभणी, लातूर, वाशिम, अकोला , ठाणे, रायगड या लोकसभा मतदार संघामध्ये मुस्लीम मतदारांची संख्या आहे. परंतू लोकसंख्ये नुसार आत्तापर्यंत राजकिय प्रतिनिधीत्व मिळाल का ? हा सुद्धा प्रश्न मुस्लीमासाठी विचार करण्याचा आहे . 

महाराष्ट्र राज्य निर्मिती झाल्या पासून लोकसभेवर निवडून जानाऱ्या मुस्लीम खासदारांची संख्या नागण्य आहे. आता पर्यत फक्त १४ वेळा मुस्लीम खासदार लोकसभेवर निवडून गेले आहेत यातही अब्दूल रहमान आंतूले यानाच तब्बल चार वेळा सन 19८9,1९९१, १९९६ व २००४ पर्यंत  कुलाबा लोकसभा मतदार संघातून निवडून नेले होते. तर १९६७ साली आकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेस कडून के. एम . ए एच सरदारखान,१९७१ मुंबई मतदारसंघात काँग्रेस कडून कादर अब्दूल साळेभाय,१९७१ अकोला मतदारसंघात काँग्रेस तर्फे के एम असगर हुशेन सरदारखान,१०७१ चांदा ( चंद्रपूर) काँगेस तर्फे अब्दूल शफी , १९८० व १९८४ वाशिम मतदार संघातून दोन वेळेस काँगेस तर्फे गुलाम नबी आझाद ,१९८० औरंगाबाद मतदार संघातून काझी सालम,१९८४ रत्नागिरी मतदारसंघातून काँग्रेस तर्फे हुशेन दलवाई ,२०१९ औरंगाबाद ए आय एम आय एम तर्फे इम्तियाज जलील हे खासदार निवडून आले होत… मुस्लीम समाज ही काँग्रेसची पारंपारिक व्होट बँक समजली जाते . परंतू जनतेतून विचार मांडले जातात मुस्लीम समाजाचा कलही काँग्रेस च्या बाजूने आसतो. आतापर्यंतच्या लोकसभा निवडणूकींचा विचार केला तर काँग्रेसनं मुस्लिम समाजातील एकातरी उमेदवाराला संधी दिली होती परंतू या लोकसभा निवडणूकीत पहिल्यांदा काँग्रेस ने एकही मुस्लीम उमेदवार दिलेला नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त केली जात आहे…

 शेवटच्या टप्प्यात कॉग्रेस नेते आरीक नशिम खान यानी तशी नाराजी व्यक्त केली परंतू त्यांची तशी दखल कांग्रेस पक्षाने घेतली नाही… काँग्रेस आणि महाविकास आघाडीन एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही. काँग्रेस नेते मागील एका कार्यक्रमात बोलून गेले की मुस्लिम उमेदवार विजयी होईल असा उभा करायचा होता तर का उभा केला नाही. मुस्लीम जानकाराना असा प्रश्न पडतो की राज्यात काँग्रेस कडून निवडून येईल असा उमेदवार पक्षाकडून तयार का केला नाहित… की मुस्लीम समाजातील खासदार करावे असे काँग्रेस ला वाटले नाही ? हा सुद्धा मुद्दा मुस्लीम नेत्याना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मुस्लीमांना उमेदवारी देताना राजाकिय पक्षाना का करावा लागतोय विचार ? ज्या पक्षाची व्हॉट बँक मुस्लिम समाज आहे ते सुद्धा प्रतिनिधीत्व देत नाही… हे नेमका कशाचा परिणाम आहे. वेळीच मुस्लिम समाज आत्मचिंतन नाहि केल्यास पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणूकीत प्रतिनिधीत्व मिळणे कठीण होईल. स्वतःला शैक्लूरिझम महणनाऱ्या पक्षाची मानसिक्ता आशि या लोकसभा निवडणूकीत दिसून आली आहे. की मुस्लीम मतदार भाजपला मतदान करनार नाहीत तर मुस्लीम समाजास राजकीय प्रवाहात घेतल काय नाही घेतल तरी मतदान काँग्रेसलाच मतदान केल्याशिवाय दुसरा प्रयायच मुस्लीमाकडे नाही ही मानसिक्ता काँग्रेस पक्षाची झाली आहे . 

 या निवडणूकीत काँग्रेस पक्षाकडून मुस्लीम कार्यक्रत्यांना त्याचा प्रत्यय दिसून आला आहे… म्हणूनच भाजपास वाटतोय मुस्लीम आम्हाला मतदान करणार नाहीत व काँग्रेस ला खात्री आहे की मुस्लीम समाजास विचारल नाही तरी मतदान काँग्रेस ला करतील म्हणून मुस्लीम मतदारा समोर एकीकडे आड तर दूसरी कडे विहीर आशि प्ररिस्थिती मुस्लीम मतदाराची झाली आहे. यावर मुस्लीम समाज आत्म परिक्षण करतील आसच सद्यातरी म्हणावे लागेल.



जैनोदीन पटेल रावणगावकर 

उपसंपादक दैनिक शब्दमत नांदेड

8530828612

Post a Comment

Previous Post Next Post