प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित "कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड्., पेठ वडगाव येथे शुक्रवार, दिनांक 03 में 2024 रोजी प्राचार्या डॉ.निर्मळे आर.एल. मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थी व सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मिळून महाविद्यालयांमध्ये मतदान जागृती विषयी शपथ घेण्यात आली
लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत मतदान लोक जनजागृती कार्यवाहीस अनुसरून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या मध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी कार्यवाही करण्यात आली. आपल्या समाजाचे व देशाचे भवितव्य बनविण्यासाठी, देशाच्या भवितव्याला योग्य आकार देण्यासाठी निवडणुकीमध्ये सर्वांनी योग्य मतदान करणं गरजेचं आहे. सदृढ व सक्षम लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे. मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. केवळ मतदान हा आपला हक्क व अधिकार न समजता ते आपलं एक देशाप्रतीच महान कर्तव्य आहे असा समज लोकांच्या मध्ये निर्माण करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्राध्यापकांच्या कडून योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनाही आपल्या गावामध्ये व आसपासच्या परिसरामध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्याविषयी योग्य त्या सूचना देण्यात आल्या.
यासाठी सर्व विद्यार्थी व महाविद्यालयातील सर्व स्टाफ यांनी एकत्र येऊन सामूहिक रीतीने मतदाता शपथ घेतली.