शिक्षक व्यक्तिमत्व व आव्हाने" या विषयावर चर्चासत्रचा कार्यक्रम संपन्न


प्रेस मीडिया लाईव्ह :

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप, संचलित "कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड्. पेठ वडगाव" येथे गुरुवार ,दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी "शिक्षक व्यक्तिमत्व व आव्हाने" या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा. श्री. एस. डी. पाटील सर ( निवृत्त अध्यापक चिंचवाड हायस्कूल चिंचवाड ता -करवीर ,जिल्हा-कोल्हापूर)  तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ.सौ. निर्मळे आर.एल. उपस्थित होते. 

प्रथम कार्यक्रमाची सुरुवात दीप  प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छात्राध्यापिका सौ. वर्षा कोळी यांनी केले. तसेच पाहुण्यांची ओळख छात्राध्यापिका निवेदिता पाटील यांनी केले.पाहुण्यांचे स्वागत प्राचार्यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या ओघवत्या शैलीत खूप छान अगदी मोलाचे मार्गदर्शन केले, त्यांनी शिक्षक कसा असावा, शिक्षक हा कसा क्षमाशील, वक्तशीर, चारित्र्यसंपन्न असावा हे अगदी उत्तमरीत्या विद्यार्थ्यांना सांगितले. त्याचबरोबर शेक्सपियर,बर्नार्ड शॉ, वि. स. खांडेकर, अश्या लेखकांची उत्तम उदाहरणे दिली . त्यांच्या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय निर्मळे मॅडम यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले.

 द्वितीय वर्षाची छात्राध्यापिका सारिका माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार छात्राध्यापिका अश्विनी सूर्यवंशी यांनी मानले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका अपर्णा काटकर यांनी केली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा.शिरतोडे व्ही. एल., प्रा.पवार ए.आर., प्रा सावंत ए.पी. ग्रंथपाल सौ. चौगुले एस. एस. ग्रंथपाल सहाय्यक सौ. पाटील पी.व्ही. तसेच शिक्षकेतर कर्मचारी व प्रथम व द्वितीय वर्षातील छात्राध्यापक छात्राध्यापिका उपस्थित होते. अशा प्रकारे अतिशय उत्तमरीत्या हे चर्चासत्र संपन्न झाले.

Post a Comment

Previous Post Next Post