सहा आरोपीतांना केले जेरबंद
प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील :
२२/५/२०२४ रोजी १६.०० वा. पेण पोलीस ठाणे हद्दीत मौजे अंबविली फाटा ता. पेण मुंबई-गोवा हायवे लगतच्या नवीन साई सहारा हॉटेल पासून पनवेल बाजुकडे ५०० मीटर अंतरावर गोवा लेंथच्या खड्डयात एक इसमाचा गोणपाटात बांधलेला व दुर्गधीं सुटलेला अनोळखी मृतदेह आढळून आलेला होता. सदर बाबत पेण पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १६४/२०२४ भादवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेव खाडे स्थानिक गुन्हे शाखा यांनी सपोनि भास्कर जाधव, सपोनि संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलीस उप निरीक्षक विकास चव्हाण व अंमलदार यांनी सदर घटनास्थळी भेट दिली व सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड अलिबाग यांनी समांतर तपास सुरू केला प्रथम गुन्हयातील मयताची ओळख पटविणे व आरोपीचा शोध घेणे हे महत्वाचे आव्हान पोलीसांसमोर होते. सदर गुन्हयाचा तपास करणे करिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि भास्कर जाधव, सपोनि संदीप पोमण, पोउनि धनाजी साठे, पो.उप निरीक्षक विकास चव्हाण व १६ अंमलदार यांचे चार तपास पथक तयार करण्यात आली व गुन्हयाचा तपास सुरू केला.
सदर पथकांनी गेले ३ दिवस विश्रांती न घेता अहोरात्र तपास केला व आपआपले तपासाचे कौशल्य पणाला लावून त्यानुसार गुप्त बातमीदार तसेच तांत्रीक साधनांचा वापर करून गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेतला तांत्रीक तपासामध्ये आरोपीत नामे अनुज भालचंद्र मोरे रा. आजादनगर मांटगा वेस्ट मुंबई निष्पन्न झाला त्यानंतर माननीय वरिष्ठांचे परवागीने एक पथक सदर ठिकाणी जावून सदर आरोपीतास ताब्यात घेण्यात आले सदर पथकाने सदर आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा कबुल केला व त्याने सदर गुन्हयातील त्याचे साथीदारांचे नावे सांगितली त्यानुसार दुस-या पथकाने आरोपीत नामे १. मनोज विष्णु गांगुर्डे २. गणेश नारायण देशमुख ३. कानिफनाथ सुरेश म्हात्रे ४. सुमीत केशव चौरे यांना पनवेल परिसरातून तात्काळ ताब्यात घेतले त्यानंतर सदर गुन्हयात एक महिला आरोपी असल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार एक पथकाने महिला अंमलदारासह जावून रसायनी परिसरातून ताब्यात घेतले एकूण ६ आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले त्याचेकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा कबुल केला.
सदर चौकशी मध्ये असे निष्पन्न झाले आहे की, सदर गुन्हयातील मयत अभिषेक पुर्ण नाव व पत्ता माहित नाही हा हॉटेल पंजाबी पॅलेट पनवेल याठिकाणी
काही दिवस कामाला होता. सदर ठिकाणी सदर गुन्हयातील महिला आरोपी ही देखील सफाईचे काम करीत होती. सदर मयत हा महिला आरोपीस त्रास देत होता. तसेच तिचे मोबाईल मध्ये व्हिडीओ बनवत होता. त्यानंतर तो काम सोडून निघून गेला होता. तो दिनांक १७/०५/२०२४ रोजी केलेल्या कामाचा पगार घेणेसाठी सदर हॉटेलवर आलेला होता. त्यावेळी त्याने महिला आरोपीताचा मोबाईल चोरी करून घेवून गेलेला होता. सदर गुन्हयातील ताब्यात घेतलेला आरोपी सदर हॉटेल मध्ये काम करणारे मॅनेजर, वेटर व स्वयंपाकी आहेत. सदर प्रकार महिला आरोपीने मयताने तिचे बरोबर केलेले वर्तन व चोरलेल्या मोबाईल बाबत माहिती दिली त्यावरून मॅनेजर आरोपीत नामे मनोज गांगुर्डे याने मयतास संपर्क साधून दिनांक १९/०५/२०२४ रोजी १०.४५ वा. बोलावून घेतले मयत त्या ठिकाणी आला असता त्यांनी त्यास हॉटेल मध्ये बसवून त्यास सदर महिलेस का त्रास दिला व तिचा मोबाईल का चोरी केला याबाबत विचारणा करून त्यास सर्व आरोपीत यांनी संगनमत करून सर्वांनी लाथाबुक्यांनी त्याला खाली पाडून छातीवर, पोटावर मारले त्यानंतर तो जागीच मयत झाला. मयत झालेनंतर आरोपीतांनी मयतास हॉटेलच्या फ्रिज मध्ये कोंबून बसविले व एक भाडयाचा टेम्पो बोलावून सदर मयत बसविलेला फ्रीज टेम्पो मध्ये घालून ग्रीन पार्क धाव्यावर आणून ठेवला. त्यानंतर रात्र झालेनंतर मयतास गोणी बांधणेसाठी पनवेल येथून आरोपीत नामे अनुज चंद्रशेखर मोरे व पाहिजे आरोपी राज पुर्ण नाव माहित नाही यांनी बीग साडी बाजार पनवेल या ठिकाणावरून गोणी खरेदी केली व त्यानंतर फ्रिज मधून मयतास बाहेर काढून त्या गोणीत भरून आरोपी नामे अनुज चंद्रशेखर मोरे व राज पुर्ण नाव माहित नाही यांनी गोणीत बांधलेला मृतदेह स्कुटीवरून नेवून वर नमुद ठिकाणी रस्त्याच्या कडेला फेकून दिला व सर्व आरोपी पसार झाले त्यांना आज रोजी अटक केली आहे.
सदरची कामगिरी मा.श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक रायगड, मा.श्री अंतुल शेंडे, अपर पोलीस अधीक्षक रायगड यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि भास्कर जाधव, सपोनि संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, सहा. फौज, दिपक मोरे, प्रसाद पाटील पाहवा/संदीप पाटील, सुधीर मोरे, अमोल हंबीर, प्रतिक सावंत, जितेंद्र चव्हाण, राकेश म्हात्रे, रूपेश निगडे, पोशि ईश्वर लांबोटे, स्वामी गावंड, अक्षय जगताप, अक्षय सांवत, बाबासो पिंगळे, लालोसो वाघमोडे, ओकांर सोंडकर, भरत तांदळे यांनी केली आहे. सदर गुन्हाचा तपास पेण पोलीस ठाणे हे करीत आहेत