जे एम म्हात्रे चँरिटेबल संस्थेच्या प.पां. मुंबईकर इंग्लिश मिडीयम स्कूलचा 100% निकाल

 सृष्टी पाटील उरण तालुक्यात प्रथम"

सृष्टी पाटील उरण तालुक्यात प्रथम"

 सलग सहाव्या वर्षीही परंपरा कायम

प्रेस मीडिया लाईव्ह :

 विशेष प्रतिनिधी :  सुनील पाटील

  पनवेल :  जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मिडियम स्कूल,वेश्वी शाळेचा इयत्ता दहावीचा बोर्डाचा 2023-24 वर्षाचा एकूण निकाल सलग सहाव्या वर्षीही 100 % एवढा लागला. कुमारी सृष्टी किरण पाटीलने 96.00% गुण मिळवून संपूर्ण उरण तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला, कुमार  हर्ष केशव ठाकूर 86.60% गुण मिळवून शाळेत द्वितीय  तसेच कुमार विघ्नेश अजित 86.00% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. 

         शाळेच्या एकूण निकालामध्ये 65 विद्यार्थ्यांपैकी 16 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य तर 44 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवून घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक माननीय श्री.जे.एम.म्हात्रे(भाऊ),संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे, संस्थेचे सचिव माननीय श्री.जे.के मढवी सर, शाळा समितीचे चेअरमन श्री.चंद्रकांत मुंबईकर,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. प्रितम टकले सर व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.तृप्ती म्हात्रे मॅडम यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शहरी भागातील विद्यार्थ्यां सोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी श्री.जे एम म्हात्रे साहेब यांच्या विचाराने सुरू केलेल्या शाळांमधील निकाल पाहून समाधान वाटते आणि यापुढेही तो सतत वाढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू:- 


श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे, 

अध्यक्ष 

जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था

Post a Comment

Previous Post Next Post