बेकायदेशीर होर्डिंग्ज / मोबाईल टॉवर वर करवाई करण्याची पत्रकार संघर्ष समितीची मागणी


प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

मुंबईतील घाटकोपर होर्डिंग्ज  दुर्घटनेची घटना पनवेल महापालिका हद्दीत होऊ नये याकरिता , पनवेल महानगर पालिका हद्दीतील बेकायदेशीर होर्डींज ,मोबाईल टॉवर तातडीने काढण्याचे  आदेश द्यावेत  अशा आशयाचे निवेदन पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी  पनवेल महापालिका आयुक्तांना ई-मेल द्वारे दिले आहे .

        होर्डिंग्ज कोसळून दुर्घटना ,अपघात होण्याच्या घटनेत वाढ होत आहे याला मुख्य कारण म्हणजे स्थैर्यता प्रमाण पत्र नसणे , तज्ज्ञांकडून होर्डिंग्ज चे डिझाईन न करणे ,वेळोवेळी त्या होर्डिंग्ज ची  न तपासणी करणे ,स्ट्रॅकचर  ऑडिट न  करणे  तसेच बाह्य जाहिराती करताना उभारलेले होर्डिंग्ज यांचे आकार मर्यादित नसणे त्या भागातील वाहणारे  पावसाळी वादळ वारे यांचा आढावा घेऊन आकार ठरवून न देणे  अशी विविध करणे अपघातास कारणीभूत असून यामुळे  निरपराध नागरिकांचे नाहक बळी जात आहेत .

      या निवेदनाद्वारे अशी विनंती करणेत येत आहे कि १)  पनवेल महापालिका हद्दीतील बेकायदेशीर होर्डिंग्ज तातडीने काढण्याचे आदेश आपल्या स्तरावर द्यावेत , २) महापालिका हद्दीतील बेकायदेशीर मोबाइलला टॉवर तातडीने काढावेत ,३) ब्युरो ऑफ  इंडियन स्टॅंडर्ड या राष्ट्रीयकृत  जे निकष ठरवून दिले आहेत त्या निकषाच्या आधारे परवाना धारक होर्डिंग्ज ची तपासणी करावी त्यात  तफावत   असल्यास ते होर्डिंग्ज हि तातडीने काढण्यात यावेत ,४)स्टॅबिलिटी  सर्टिफिकेट महापालिका अभयंत्याकडून तपासून घेण्यात यावेत अथवा महापालिका अभियंत्यांकडून  फेर तपासणी करावी तसा अहवाल सादर करून ठेवावा दुर्घटना घडल्यास महापालिका अभियंत्यांवर हि कारवाई करावी  ५)ज्या होर्डिंग्ज ला महापालिकेने परवानगी  दिली आहे त्या होर्डिंग्ज ची दरवर्षी / वेळोवेळी डागडुजी करणे परवानाधारकाला बंधनकारक करावे ,कुठे वेल्डिंग निखळली  असेल , कुठे बेसमेंट जवळ अनेक वेळा खोदकाम होते ,सिमेंट निघते ती दुरुस्त करण्याच्या सूचना द्यावेत ,५ ) पनवेल महापालिका हद्दीत डिजिटल  जाहिरात  फलक लावण्यात आले आहेत  असे डिजिटल फलक वाहनधारकांचे आणि नागरिकांचे विशेष करून संध्याकाळी व रात्रीच्या वेळेस लक्ष विचलित होण्यास कारणीभूत ठरत आहेत अशा फलकाचे जाहिरात धोरण ठरवुन त्यांना हि यामुळे अपघात होणार नाहीत याची काळजी घेण्याचे निर्देष द्यावेत   ६ ) ज्या ज्या ठिकाणी बेकायदेशीर होर्डिंग्ज उभारल्या आहेत त्या इसमांवर फोजदारी कारवाई करावी तसेच उभारलेली होर्डिंग काढण्याचा खर्च वसूल  करण्यात यावा . अशा आशयाचे निवेदन पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी पनवेल महानग पालिकेला दिले आहे .

Post a Comment

Previous Post Next Post