प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
लातुर - विहीरीच्या पंपासाठी नवीन वीज कनेक्शन जोडणी करून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना वीज कर्मचारी सतीश उत्तमराव कांबळे (वय 38.रा.हंगरगा ता.निलंगा जि.लातूर ) याला लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडून कारवाई केली.
अधिक माहिती अशी की,तक्रारदार यांच्या वडीलांची औसा जि.लातूर येथे शेतजमीन असून या शेतजमीनीत विहीरीच्या पंपासाठी नवीन वीज कनेक्शनची गरज असल्याने तक्रारदारांने संबंधित विभागाकडे अर्ज केला होता.या अर्जानुसार वीज कर्मचारी सतीश कांबळे यांनी वीज जोडणीचे काम करून देण्यासाठी 1डिसे .23 रोजी 13 हजार रुपये आणि 6 डिसे.23 रोजी 2 हजार रुपये असे एकूण 15 हजार रुपये फोन पे द्वारे देऊन वीज जोडणी केल्या नसल्याने तक्रारदार यांनी कांबळे यांची भेट घेतली असता आणखी 3 हजारांची मागणी केली असता त्यात तडजोड करून 2 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली असता या विभागाने खात्री करून तुळजापूर टी पॉइंट येथे असलेल्या शिंदे राइस समोर कांबळे याला दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने पकडून त्याच्यावर औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिराप्रर्यत चालू होते.
ही कारवाई वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक संतोष बर्गे ,पोलिस निरीक्षक अन्वर मुजावर यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.