प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - अपघातात जखमी झालेल्या दत्तात्रय अशोक पवार याचा सीपीआर रुग्णालयात शनिवार दि.11/05/2024 रोजी उपचार चालू असताना मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की,यातील मयत याचा शनिवार दि.04/05/2024 रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास संभाजीनगर परिसरातील आयटीआय जवळ त्याची दुचाकी स्लिप होऊन अपघात झाला होता.त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना आज त्याचा मृत्यु झाला.