प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर, दि. 06 :लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 47 कोल्हापूर व 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, दि. 7 मे रोजी मतदान होत आहे.
यासाठी कोल्हापूर मतदारसंघात 2 हजार 156 मतदान केंद्र तर हातकणंगले मतदारसंघात 1 हजार 830 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यातील या मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन व मतदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य, साधनसामुग्री घेऊन जाणारी कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातील मतदान पथके मतदानस्थळी दाखल झाली आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
***
Tags
कोल्हापूर