नोकरीच्या शोधात मित्राकडे आलेल्या इंचलकरंजीच्या तरुणाचा मृत्यु.





प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - नोकरीच्या शोधात मित्राकडे आलेला रत्नदिप संदिप थोरात (वय 20 .रा.16/879 बंडगर मळा , गोंधळी गल्ली इंचलकरंजी ) याचा मंगळवार  दि. 30 /04 /24 रोजी 6.30 च्या सुमारास  मृत्यु झाला.याची फिर्याद अक्षय उत्तम थोरात (चुलत भाऊ)यांनी सीपीआर पोलिस चौकीत दिल्याने या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की ,यातील मयत याचा मित्र वाडकर गल्ली क.बावडा येथे रहात असून तो आपल्या मित्राकडे नोकरीच्या शोधात आल्याचे सांगून त्याने काही दिवस रहाणार असल्याचे मित्राला सांगितले.त्याचा मित्र आणि त्याचे सहकारी काही कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहेत.30 /04/24 रोजी रुम मध्ये झोपलेल्या रत्नदिपला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्याने प्रतिसाद न दिल्याने त्याला बेशुध्दावस्थेत नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यु झाला याची माहिती शाहुपुरी पोलिसांना समजताच पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांच्याकडे आणि रुम मधील विद्यार्थी यांच्या चौकशी करुन त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला .त्याच्या मृत्युचे कारण स्पष्ट झाले नाही.मयत रत्नदिप याचे वडील हातमाग चालवित असून त्याची आई खाजगी शाळेत शिक्षीका आहे.

Post a Comment

Previous Post Next Post