कंळबा कारागृहात घेतलेल्या झडतीत आणखी एक मोबाईल सापडला .



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापुर- कोल्हापुरातील कंळबा कारागृह अलिकडच्या काळात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे.आज सोमवारी सकाळच्या सुमारास बरयक नं.7 मध्ये कारागृहाच्या विशेष पथकाने घेतलेल्या झाडा झडतीत आणखी एक नवीन मोबाईल बॅटरीसह मिळुन आला.तेथे असलेल्या सर्कल जवळील मातीच्या ढिगार्‍याखाली प्लास्टिकच्या पिशवीत दडवून ठेवला होता.

कंळबा कारागृहाचे प्रभारी अधिक्षक विवेक झेंडे यांनी पदभार घेतल्या पासून दिवसातुन तीन वेळा तपासणी सुरु केल्यामुळे ता.1/05/24 ते 10/05/24 या कालावधीत 25 मोबाईलसह ,बँटरी ,केबल आणि चार्जरचा मोठा साठा हाती लागल्याने आज सोमवार सकाळच्या सुमारास अचानक बरयक नं.7 .ची तपासणी केली असता सर्कल जवळील मातीचा ढ़िगारा उकरण्यात आला असता प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेला बँटरीसह मोबाईल सापडला.यामुळे सर्कल मधील सर्वच बरयकची तपासणी करण्यात येत आहे.आदेशांचे उल्लंघन करण्यारयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे प्रभारी अधिक्षक विवेक झेंडे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post