प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - रोड अपघातात जखमी झालेला शिवराज अश्वनाथ महाडीक (वय 6.रा.महाडीकवाडी ,क.ठाणे ,ता.पन्हाळा) याचा मंगळवार दि.28/05/2024 रोजी सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना साडेसहाच्या सुमारास मृत्यु झाला.याची फिर्याद अश्वनाथ रामचंद्र महाडीक (वय 34.) यांनी सीपीआर पोलिस चोकीत दिली.
अधिक माहिती अशी की,यातील मयत शिवराज हा आपल्या वडीलांच्या समवेत मोटारसायकल वरुन रविवार दि.26/05/2024 रोजी राक्षी येथे आपल्या आतीकडे गेला होता.परत येताना राक्षी फाट्यावर आल्या नंतर समोरा समोर मोटारसायकलची धडक होऊन शिवराजसह इतर दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर सी पीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवराजच्या डोक्याला मार लागल्याने त्याच्या नातेवाईकांनी जखमी अवस्थेत प्रथम खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार घेऊन सोमवार दि.27/05/2024 रोजी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .तेथे उपचार चालू असताना आज मंगळवार दि.28/05/2024 रोजी सायंकाळी साडे सुमारास मृत्यु झाला.शिवराजचे वडील शेती करीत असून त्याला मोठी बहिण आहे .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.