प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - आर.के.नगर परिसरातील साई मंदीरच्या पाठीमागे असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्स या सराफ दुकानात चोरी करणारे रविराज महेश कसबेकर(वय 27) आणि अरुण मल्लाप्पा शिंदे (वय 46.रा.टेंबलाईवाडी झोपडपट्टी).या दोघां चोरट्यांना करवीर पोलिसांनी अटक करून लोंखंडी चिमटा आणि लोखंडी सळी जप्त केली असून पोलिसांनी त्यांना बुधवार दि.(29) रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या बाबत सराफ व्यावसायिक महादेव शंकरराव गायकवाड (वय 66.रा.उभा मारुती चौक ,शिवाजी पेठ,कोल्हापूर) यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.हा प्रकार मंगळवार (दि.28) रोजी पहाटेच्या सुमारास आर.के.नगर परिसरातील साई मंदीर पाठी मागे असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्स या सराफ दुकान फोडून चोरी करण्यारया महादेव गायकवाड आणि अरुण शिंदे हे लोंखडी चिमटा आणि सळीच्या सहाय्याने दुकानाचे पुर्वेकडील आणि उत्तरेकडील शटर तोडत असल्याचे आढळून आले.या चोरट्यांनी दुकानात लावलेले सीसीटिव्ही क्यमेरे काढ़ुन चोरी करीत असताना गस्तीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन अटक केली.