प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - राजारामपुरी येथे मुले पळवून नेत असल्याच्या संशयातून जमावाणे दोघां परप्रांतियांना बेदम मारहाण करून त्यांना शाहुपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. समीर जोगी आणि सोहेल जोगी ( रा.मुळचे उत्तरप्रदेश,सध्या रा.कृपामाई हॉस्पिटल शेजारील झोपडपट्टी ,मिरज.). अशी त्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी की,संशयीत हे भिक्षुक असून सगळीकडे भटकत असतात हे मिरज येथे झोपडपट्टीत कुंटुबियासमवेत रहात आहेत.आज शनिवार दि.11/05/2024 रोजी राजारामपुरी येथे असलेल्या लॉ कॉलेज एक शाळकरी मुलगा आपल्या मित्रांच्या दुकानात थांबला होता.त्या वेळी संशयीत अनोळखी युवक जात असताना त्यांच्या संशयापद हालचाली वाटल्याने तेथुन जात असलेल्या रिक्षा चालकाला मुले पळून नेत असल्याचे वाटल्याने त्याने आरडा ओरडा करून त्यांचा पाठलाग करत त्यांची चौकशी केली असता ते परप्रांतिय असल्याने त्यांना मराठी बोलता येत नसल्याने जमावाने त्यांना त्यांची चांगलीच धुलाई करून शाहुपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.पोलिसांनी याची त्यांच्या कुंटुबियाकडे आणि मिरज पोलिसांनी खात्री करून हा प्रकार गैरसमजातून झाल्याचे शाहुपुरी पोलिसांनी सांगितले.