प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर जाधव :
कोल्हापूर - कागल तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून अश्विनी अतुल कांरडे (वय 43.रा.रेल्वे स्टेशनजवळ न्यु शाहुपुरी ,कोल्हापूर) यांना तीस हजाराची लाच घेतल्या प्रकरणी लाचलुचपतच्या पथकाने कारवाई करून त्यांच्यावर कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.कागल पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अश्विनी कांरडे यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अधिक माहिती अशी की,कागल येथे तहसीलदार कार्यालयात कार्यरत असलेल्या अव्वल कारकून अश्विनी कांरडे यांनी तक्रारदाराकडुन तक्रारदाराची कागल येथे जमीनचा एन.ए.दाखला देण्यासाठी 80 हजार रुपयेची लाचेची मागणी केली होती.त्यात तडजोड करून 60 हजार रुपये देण्याचे ठरविले होते.त्यातील 30 हजारांचा पहिला हप्ता मंगळवार (दि.22) रोजी तक्रारदाराकडुन घेताना अश्विनी कांरडे यांना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडून कारवाई करुन त्यांच्यावर कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.