हॉटेल मधुन बाहेर पडताना धक्का लागल्याने तरुणास मारहाण.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -हॉटेल मध्ये जेऊन बाहेर पडताना चुकून धक्का लागल्याने साते आठ जणांनी अमित अशोक सोनुले (वय 33.रा.टेंबलाई नाका ,को.). याला बेदम मारहाण करून जखमी केले आहे.हा प्रकार रविवारी (ता.12) रोजी रात्री बाराच्या सुमारास पुईखडी येथील हॉटेलात घडली.

या बाबत जखमी सोनुले यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी रविंद्र दिलीप जोशी (रा.सानेगुरुजी वसाहत,को.)विक्रम प्रकाश पाटील (रा.पडसाळी,ता.राधानगरी) आणि प्रदिप प्रकाश खुपले (रा.फुलेवाडी) यांच्यासह अनोळखी पाच सहा जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील फिर्यादी हा पुईखडी येथील एका हॉटेलात जेवायला गेला होता.जेऊन झाल्यानंतर बाहेर पडत असताना विक्रम पाटील याला चुकून धक्का लागल्याने सॉरी म्हणून माफी मागितली असताना त्यांना शिवी दिल्याचे वाटल्याने विक्रम पाटील यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने जबर मारहाण केली.यात झालेल्या झटापटीत सोनुले यांचा मोबाईल फुटला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post