प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कोल्हापूर शहरात आजची तरुण पिढी आपल्या दुचाकी वाहनांचे सायलेंन्सर बदलून वाहन चालवून वेगवेगळ्या आवाज काढ़णारे सायलेंन्सर बदलून वाहन चालविण्याची तरुणाई मध्ये नवीन क्रेझ निर्माण झाली असून त्याचा त्रास नागरिकांना होत असल्याने शहर वाहतूक शाखेच्या वतीने अशा 132 वाहनांवर कारवाई करून 1 लाख 32 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह त्यांच्या सहकारयांनी केली.
तसेच नागरिकांनी आपल्या वाहनाचे सायलेंन्सर बदलून नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन बदलेला सायलेंसर बदलून मुळ कंपनीचा सायलेंसर बसवावा असे आवाहन शहर वाहतूक शाखेच्या वतीने केले आहे.