प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हासह सोलापूर ,सांगली ,रत्नागिरी, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्हा करिता कोल्हापूरला सर्किट बेंच होण्यासाठी प्रयत्न करणार असे मनोगत नुतन अध्यक्ष Ad. सर्जेराव खोत यांनी अध्यक्षपदाचा स्विकारताना केला.हा कार्यक्रम जिल्हा न्यायालयातील शाहु सभागृहात पार पडला.
या वेळी मावळते अध्यक्ष Ad.प्रशांत देसाई यांनी आणि त्यांच्या पदाधिकारयांनी नुतन अध्यक्ष Ad.सर्जेराव खोत,उपाध्यक्ष Ad. उमेश माणगांवे,सचिव Ad. निशीकांत पाटोळे,सहसचिव Ad. राजू ओतारी ,महिला प्रतिनिधी Ad. सोनाली सेठ यांच्यासह इतर पदाधिरी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी बार कौंन्सिलचे माजी अध्यक्ष Ad . विवेक घाटगे ,जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल हजर होते.या वेळी Ad.महादेवराव आडगुळे,Ad. राजेंद्र चव्हाण ,Ad.रणजित गावडे ,Ad. प्रशांत शिंदे यांनी आपले मनोगतात सर्किट बेंच साठी लढ़ण्याचा सल्ला देऊन शुभेच्छा दिल्या.या वेळी इतर वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.