राजेंद्रनगर येथे रात्रीच्या सुमारास तरुणांच्या कडून वाहनांची तोडफोड करून धुमाकुळ.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

  कोल्हापुर - राजेंद्रनगर परिसरात  रविवारी रात्रीच्या सुमारास टोळक्यांच्या कडून मोटारसायकल वरुन आलेल्या हातात लोंखंडी गज आणि काठ्या घेऊन तेथे उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करून मोठे नुकसान करून धुमाकूळ घातला.या झालेल्या तोडफोडीत वाहनांचे मोठे नुकसान झालं आहे.

या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रविवारी रात्रीच्या सुमारास सहा जणांच्या टोळक्याने मोटारसायकलवरुन राजेंद्रनगर परिसरात येऊन तेथे दत्त मंदीर जवळील एका गल्लीत शिरुन तेथील नागरिकांनी आपल्या दारात उभ्या केलेल्या दोन रिक्षा ,कार ,टेम्पो आणि दुचाकी असे एकूण 10 वाहनांची तोडफोड केली.तसेच बॉनेटवर लोंखडी गजाने तोडफोड करून गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या.त्या परिसरात मोठा आवाज झाल्याने नागरिक घरा बाहेर आल्या नंतर हल्लेखोर दहशत माजवत निघुन गेले.नागरिकांनी राजारामपूरी पोलिसांना फोन वरुन माहिती दिली असता राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे हे  आपल्या पोलिस  कर्मचारी तसेच रात्रीचे गस्त घालणारी पोलिस पथक  घटना स्थळी दाखल झाले.

  हा प्रकार जुन्या वादातुन झाल्याची शक्यता पोलिसांच्या कडुन वर्तवली जात आहे.या दहशत माजविलेल्या तरुणानी तोंडाला रुमाल बांधले होते.तर काहीनी  तोंडाला मास्क घातल्याचे समजते.या परिसरात असलेल्या सीसीटिव्ही फुटेज द्वारे  संशयीताची रात्री उशिरापर्यंत ओळख पटविण्याचे काम चालू होते .

Post a Comment

Previous Post Next Post