प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - हुपरी येथील सराफ व्यावसायिक सम्मेद अनिल पाटील (वय 23.रा.राजगुरुनगर ,हुपरी)याने मंगळवार ता.21/05/2024 रोजी रात्री अकराच्या सुमारास रहाते घरी बेशुध्दावस्थेत मिळुन आल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता रात्री पावणे दोनच्या सुमारास उपचारापुर्वी मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.या बाबतची माहिती सुनिल पायगोंडा पाटील यांनी सीपीआर पोलिस चौकीत दिली आहे.
अधिक माहिती अशी की,सम्मेद पाटील यांचे हुपरी येथे सोन्या-चांदीचे दागिन्याचे दुकांन असून ते नामांकीत मोठे व्यावसायिक असल्याचे सांगितले.त्यांनी कोल्हापुरात राजारामपुरी येथे नवीन बंगला घेतला असून त्या निमीत्त जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता.त्यामुळे घरातील नातेवाईक कोल्हापूरात कार्यक्रमात असल्याने सम्मेद हा एकटाच हुपरी येथे जाऊन कोणतेतरी विषारी औषध घेऊन बेशुध्द होऊन पडल्याचे आढ़ळल्याची अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.सम्मेद याला बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची सीपीआर पोलिस चौकीत झाली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.