प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कनाननगर येथे रहात असलेली दिव्यांग महिला उज्वला शिवाजी चव्हाण (वय 35 रा.ए.पी.जे.कंपाउंड ,कनाननगर) या महिलेस 15 ते 20 महिलांनी लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.तसेच तिच्या भावालाही शिवीगाळ केली.हा प्रकार बुधवारी (दि.15) दुपारी एकच्या सुमारास घडला असून त्यांनी या बाबतची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
अधिक माहिती अशी की,यातील जखमी उज्वला चव्हाण यांच्या घरी नागांव फाटा येथे रहात असलेले पाहुणे कनाननगरात आले होते.उज्वला यांच्या आईला या पूर्वी शिवीगाळ झाली होती.याचा जाब विचारायला उज्वला या गेल्या असता या वेळी आलेल्या पाहुण्यांनी उज्वला यांना बेदम मारहाण करण्यात आली.त्या दिव्यांग असल्याचे माहिती असूनही भर रस्त्यात खाली पाडून पाठीवर ,तोंडावर गुद्दे मारत पायावर घागर मारुन मारहाण केली.यात त्या जखमी झाल्या .आणि जाता जाता तिच्या भावाला ही मारहाण करण्याची धमकी देत शिवीगाळ करण्यात आली आहे.या प्रकरणी 15 ते 20 नागांव येथील महिलांच्यावर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शाहुपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक डंबाळे पुढ़ील तपास करीत आहेत.