प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- तक्रारदाराची जमीन एन.ए.करण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच घेताना कागल तहसीलदार कार्यालयातील महिला कर्मचारी अश्विनी अतुल कांरडे (वय 43.रा.रेल्वेस्टेशन जवळ,न्यु शाहुपुरी कोल्हापूर) या महिलेस मंगळवारी (दि.21) रोजी लाचलुचपतच्या पथकाने ताब्यात घेतले.या कर्मचारी महिलेस ताब्यात घेऊन कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की,तक्रारदार याची कागल येथे जमीन असून ती एन.ए.करण्यासाठी कागल तहसीलदार कार्यालयात अर्ज केला होता.या विभागात अव्वल कारकून अश्विनी कांरडे असून यांनी तक्रारदाराकडे 80 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.त्यात तडजोड करून 60 हजार रुपये देण्याचे ठरविले.तक्रारदारांने या बाबतची माहिती लाचलुचपत पथकास दिली असता.या पथकाने याची खात्री करून सापळा रचून 30 हजारांचा पहिला हप्ता घेत असताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडून कारवाई केली.
ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक श्री.सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.