प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - इंडिगो कंपनीच्या विमानातुन हैदराबादकडे चालेला प्रवासी राहुल रविंद्र पाटील (वय 23.सध्या .रा.कणेरी ,ता.करवीर मुळगाव कापशी माद्याळ ता.कागल).याच्याकडे असलेल्या बँगेत पोलिसांना पिस्तुलाची गोळी सापडली.हा प्रकार शनिवारी (ता.18) सकाळी अकराच्या सुमारास घडला.विमानामध्ये प्रवाशांचे साहित्य चेक करत असताना निदर्शनास आले.
शस्त्र आणि प्राणघातक वस्तु सोबत घेऊन विमानातुन प्रवास करणे बेकायदेशीर असून तसेच अशा वस्तु सोबत घेऊन जाण्यास बंदी असूनही राहुल पाटील हा आपल्या बँगेत पिस्तुलाची गोळी घेऊन चालला होता.त्या वेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिस हवालदार सरीता सदाशिव देवर्डेकर यांनी गोळी जप्त करून राहुल पाटील यांच्या विरोधात गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असता पोलिसांनी राहुल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.