लाच प्रकरणी दोघांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल .


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - सात बारा पत्रकी नांव नोंद करून त्या जमीनीचा सात बारा उतारा देण्यासाठी लाचेची मागणी करणारा कोडोली येथील कार्यालयातील मंडल अधिकारी यांच्यासह मध्यस्थी करणारा यांच्यावर लाचलुचपतच्या पथकाने कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यात अभिजीत नारायण पवार (रा.रुक्मिणीनगर ,कोल्हापूर) आणि त्यांचा साथीदार रणजित उर्फ आप्पा आनंदराव पाटील (वय 48.रा.कोडोली ,ता.पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी की,यातील तक्रारदार यांच्या काकानी जमीन घेतली असून त्या जमीनीला सात बारा पत्रकी नोंद करून त्याचा सात बारा मिळण्यासाठी तक्रादाराने या कार्यालयाकडे अर्ज केला होता.सदर सात बारा देण्यासाठी मंडल अधिकारी यांनी आपल्या मध्यस्था मार्फत 20 हजारांची लाचेची मागणी केली होती.त्यात तडजोड करून 15 हजार रुपये पवार यांनी मध्यस्थी रणजीत पाटील यांच्याकडे देण्यास सांगीतले.तक्रादाराने याची माहिती लाचलुचपत पथकास दिली असता या पथकाने तपास करुन लाच मागीतल्याचे आढ़ळल्याने या दोघांच्यावर कोडोली पोलिस ठाण्यात लाचलुचपत पथकातील  पोलिस निरीक्षक श्रीमती आसमा मुल्ला यांनी फिर्याद दिल्याने कोडोली पोलिसांनी या दोघांच्या गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई लाचलुचपतचे पोलिस   उपअधीक्षक श्री.सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीमती आसमा मुल्ला यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post