शहरातील पवार टोळी आणि नारळ टोळीवर कोल्हापूर जिल्ह्यातुन एक वर्षासाठी हद्दपार.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - कोल्हापूर शहरातील पवार टोळीतील प्रमुख सुहास उर्फ सोन्या भगवान पोवार याच्यासह त्याचे मयुर प्रकाश गवळी,प्रकाश मनोहर तौर ,उमेश उर्फ गोट्या बबन विटेकर (सर्व रा.कनाननगर ) आणि नारळ टोळीचा प्रमुख सौरभ उर्फ नारळ दिपक कांबळे याच्यासह त्याचे साथीदार सौरभ राजाराम कांबळे,सिध्देश विनायक कांबळे,ओंकार अजित कांबळे (सर्व रा.गंजीमाळ) यांना कोल्हापूर जिल्हयातुन पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.

अधिक माहिती अशी की,कोल्हापुर शहर आणि करवीर तालूक्यातील वाढ़ती गुन्हेंगारीच्या पाश्वभुमीवर जिल्हयातील सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारीना रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची हद्दपारीची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार करून पाठविण्याचे आदेश दिले होते.त्या नुसार शाहुपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक  यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे प्रस्ताव तयार करून पाठविले होते.या प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणुन उपविभागीय पोलिस अधिकारी,जयसिंगपुर यांची नियुक्ती केली.त्यांनी चौकशी करून पोलिस अधीक्षक यांच्याकडे अहवाल सादर केला.सदर टोळीवर वचक बसावा आणि जिल्हयातील सुव्यवस्था राखण्यासाठी एक वर्षासाठी "पवार टोळी आणि नारळ टोळीवर  पोलिस अधीक्षक महेद्र पंडीत यांनी दि.30/05_2024 रोजी हद्दपारीची कारवाई करण्यात आली.

सदर टोळीतील हद्दपार झालेली व्यक्ती कोल्हापूर जिल्ह्यात आढ़ळल्यास त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा 0231-2662333 या नंबरवर संपर्क साधावा.असे आवाहन नागरिकांना केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post