प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - राजारामपुरी येथे दिनेश अशोक सोळांकुरकर याच्या खून प्रकरणी सन्मेश अशोक तेंडुलकर याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. अधिक माहिती अशी की, राजारामपुरी येथे 7 व्या गल्लीत रहाणारा दिनेश अशोक सोळांकुरकर (वय 34)याचा रविवार दि.12/05/2024 रोजी पहाटे पावणे सहाच्या सुमारास प्लॉट नं.एस-1 कोटणीस हाइटस राजारामपुरी 7 वी गल्ली येथे हॉल मध्ये याचा अनोळखी व्यक्तीने खून केला होता.
याची फिर्याद त्याची पत्नी सुजाता दिनेश सोळांकुरकर (वय 55 रा.रेखानगर ,गारगोटी ) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली होती.पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गु न्हा दाखल केला.या गुन्हयाचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलिस अधीक्षक यांनी घटना स्थळी भेट देऊन राजारामपुरी पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या.त्या प्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक श्री.अनिल तनपुरे यांनी संशयीत सन्मेश अशोक तेंडुलकर (वय 54.रा.प्लॉट नं.एस 1 कोटणीस हाइटस राजारामपुरी 7 वी गल्ली ,को.) यांच्याकडे कसून चौकशी केली असता आपण आणि यातील मयत आमच्या घरी दारु पित बसलो असताना दिनेश यांने दारुच्या नशेत शिवीगाळ करुन मारहाण करू लागल्याने आपण दिनेश यास पाठीमागून काखेत हात घालून माने प्रर्यत घट्ट पकडून त्यास दाबून जीवे ठार मारून त्याचा खून केल्याचे सांगून गुन्हयाची कबुली दिली असता त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत ,अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे,सहा.पोलिस नि.विकास अडसुळ यांच्यासह त्यांच्या सहकारयांनी केली.