प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - बेपत्ता झालेले जेष्ठ साहित्यिक श्याम कुरळे (रा.सानेगुरुजी वसाहत) हे 21 एप्रिलच्या मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या रहात्या घरातुन बेपत्ता झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी सगळीकडे शोध घेऊन सापडले नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी या बाबतची फिर्याद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली होती.
तसेच कुरळे यांच्या विद्यार्थानीही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.त्या साठी प्रत्येक ठिकठिकाणी शहरात फोटोसहीत फलकही लावले होते.पण अनेक दिवस जाऊनही त्यांचा शोध लागत नसल्याने पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला कुरळे यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या .त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर यांनी उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथकाची नेमणूक केली असून त्यानुसार कुरळे यांचा शोध सुरु असल्याचे पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी माहिती दिली.