क्राईम न्यूज : मोटारसायकल चोरटा शाहुपुरी पोलिसांच्या हाती.


प्रेस मीडिया लाईव्ह ;

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -मोटारसायकल चोरटा रमेश रविंद्र माने (वय 25. रा.पडलीहाळ,ता.निपाणी ) याला शाहुपुरी पोलिसांनी रविवार (ता.26) रोजी अटक केली.


अधिक माहिती अशी की, संशयीत  रमेश माने हा एका मोटार सायकलची टेहळणी करीत असताना शाहुपुरी पोलिसांच्या हाती लागला .त्याने कोल्हापुरात तसेच सांगलीसह बेळगाव येथुन आता  पर्यन्त मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली.त्याच्या कडून साडेपाच लाखांच्या मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

शाहुपुरी पोलिसांच्या माहिती नुसार रमेश याचे बारावी प्रर्यत शिक्षण झाले असून तो काही वर्षा पासून शहापूर (इंचलकरजी) येथे रहात आहे.त्याने मोटारसायकल चोरुन कमी किमतीत विकत होता.रमेश हा ह्यंडेल लॉक तोडून मोटारसायकल चोरुन पसार होत असे .सदर चोरटा हा मार्केट यार्ड परिसरात येणार असल्याची माहिती शाहुपुरी पोलिसांना मिळाली असता त्या परिसरात रमेश माने याला सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली.

  ही कारवाई शाहुपुरी पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक फौजदार संदिप जाधव,कॉ.रवी आंबेकर ,बांगर ,बाबा ढ़ाकणे ,महेश पाटील आणि शुभम संकपाळ यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post