विशेष वृत्त : करवीर तालुक्यातील नागदेववाडी येथे बेकायदेशीरपणे रहात असलेल्या बांगलादेशीय महिलांना अटक .

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - करवीर तालुक्यातील नागदेववाडी परिसरातील नागदेव कॉलनी येथील साई मंदीर जवळ बेकायदेशीरपणे  रहात असलेल्या बांगलादेशीय सुमन राधेशाम वसिष्ठ उर्फ राधा उर्फ बेगम (वय 38)आणि खुशी शहाबुद्दीन भुय्या शेख (वय 25 .सध्या रा.साई  मंदीर ,नागदेव कॉलनी,नागदेववाडी .मुळ दोघी रा.सोनारगाव जि.नारायणगंज बांगलादेश)  या भारतात घुसखोरी करून कोल्हापुर जिल्ह्यांतील नागदेववाडी येथे रहात असल्याची माहिती मिळाली असता सोलापूर युनिटच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक शिल्पा मारुती यमगेकर यांनी दि.16/05/2024 रोजी सकाळी सव्वा आठच्या सुमारास  करवीर पोलिस ठाण्यात दिल्याने करवीर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गु न्हा दाखल करून अटक केली.

अधिक माहिती अशी की,वरील दोन बांगलादेशीय महिला भारत सरकारची परवानगी न घेता तसेच पासपोर्ट किंवा व्हीसा नसताना भारत देशात घुसखोरी करून कोल्हापुर जिल्हयातील करवीर तालुक्यातील नागदेववाडी येथे दि.18/12/2023 पासून आज अखेर रहात होत्या.याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाला समजताच सोलापूरच्या या पथकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक शिल्पा मारुती यमगेकर यांनी  याची फिर्याद करवीर पोलिस ठाण्यात दिल्याने करवीर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली.त्यांची झडती घेतली असता सुमन राधेशाम वशिष्ठ यांच्याकडे रिअल कं.चा दुधी कलरचा मोबाईल त्याचा IMEI नं.85152060926970/ 869657060513568 आणि 3000/रुपयेसह विवो कं.चा आकाशी कलरचा मोबाईल त्याचा     IMEI नं.869657060513576/869657060513568 या नं.मोबाईलसह सुमन राधेशाम वशिष्ठ नावाचे आधार कार्ड नं.475566565056 तसेच सुमन शर्मा नावाचे सांगली येथील रेणुकानगर ,टिंबर मार्केटचा पत्ता असलेले भगव्या कलरचे रेशनकार्ड मिळाले असून खुशी शेख यांच्याकडे आधार कार्ड ंन.9613344873063आणि पॅन कार्ड ंन.  BVTPV8181N .सापडले असून विदेशी कलम अधिनियम 1946कलम 3 सह 14 प्रवेश अधिनियम 1950 कलम 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्हयाचा तपास मपोसई वायचळ करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post