प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कोल्हापुर येथे निवृत्ती चौक येथे शुक्रवार दि. 31 /05 /2024 रोजी पहाटे चारच्या सुमारास झालेल्या सशस्त्र हल्ल्यात अक्षय रघुनाथ केसरकर (वय 27.रा.लक्षतीर्थ वसाहत) हा जखमी झाला असून त्याला त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याची फिर्याद रघुनाथ सय्यापा केसरकर यांनी सीपीआर पोलिस चौकीत दिली.तसेच गंजीमाळ परिसरात असलेल्या राजाराम चौकात झालेल्या सशस्त्र हल्ल्यात साहील सतीश कांबळे (वय 19.रा गंजीमाळ) हा जखमी झाला असून त्याच्या नातेवाईकांनी उपचारा साठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.ही घटना गुरुवार दि.30/05/2024 रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.हा हल्ला जुन्या वादातुन झाल्याचे समजते.
या दोन्ही घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.