विशेष वृत्त : शेवटी बाप तो बापच असतो ; जन्मदात्या आईने 11 महिन्याच्या मुलीला विकून टाकले ,आणि बापाने शोधून काढले.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -पैशाच्या लालसे पोटी जन्मदात्या आईनेच अवघ्या 11 महिन्याच्या मुलीला फक्त एक लाख रुपयेला गोव्याच्या जोडप्यांना विकले होते.याची तक्रार लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात 17 एप्रिल रोजी बापानेच दिली होती.या तक्रारीनुसार लक्ष्मीपुरी पोलिसांनी पत्नी पूनमसह दोघांना अटक करून त्यांच्यासह गोव्यातील जोडप्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांचे पथक गोवा येथे जाऊन त्या  लहान मुलीचा आणि त्या जोडप्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते सापडले नसल्याने पोलिसांचे पथक रिकाम्या हाताने परत आले होते.शेवटी मुलीच्या बापाने आपली जिद्द सोडली नाही.शेवटी गोवा येथे जाऊन शोध घेऊन मुलीचा ताबा मिळवला.या वरुन बापाची तळमळ दिसून येते.या वरुन पोलिसांची तपासाची तत्परता दिसून येते.कौटुंबिक वादातुन इंगळी येथील पूनम दिलीप ढ़ेंगे हिने घरात कुणालाही न सांगता आपल्या प्रियकराच्या मदतीने गोवा येथील जोडप्यांला आपल्या 11महिन्याच्या मुलीला एक लाख रुपयेला विकले होते.

पोलिसांनी गोवा येथे दोन वेळा वारी करुनही तिचा शोध लागला नाही.निवडणुकीमुळे पोलिस व्यस्त असल्याने तपासात टगळामगळ.शेवटी दिलीप ढ़ेंगे यांनी गोवा येथे जाऊन त्या जोडप्यांचा मो.नं.कसातरी शोधून काढून त्यांचा पत्ता मिळवला.आणि फोन करून मुलीला परत देण्याची विनंती केली असता.त्या जोडप्यांने कायदेशीर अडचण जाणुन एका वकीलाच्या मदतीने त्या जोडप्यांकडुन मुलीचा ताबा मिळविला.मुलीचा पहिला वाढदिवस मुलीच्या बापाने दोन दिवसांपूर्वी  धुमडाक्यात केला होता.जरी बापाने मुलीचा शोध घेतला असला तरी पोलिसांच्या समोर तपासाच्या दृष्टिने मोठे आव्हान आहे.

गोव्यातील जोडप्यांला कोल्हापूरात मुलगी विकणार आहे हे कसे कळले ,मध्यस्थी करणारा रुग्णालयातील कर्मचारी किरण पाटील यांची गाठ भेट कोठे झाली.किरण पाटील याला पूनम ढ़ेंगे ही आपल्या लहान मुलीला विकणार आहे हे त्याला कसे समजले ,कोणत्याही मुला -मुलीला दत्तक देताना किंवा घेताना पती पत्नीची संमती लागते तेव्हा कागदपत्रे करण्यारयानी पतीची संमती का घेतली नाही.यात मध्यस्थी करत असलेल्याने आता प्रर्यत असा प्रकार प्रथम केला का याचाही तपास होणे गरजेचे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post