बाल वयातच सुष्टिचा प्रामाणिकपणा .सात तोळे दागिन्यांसह 27 हजार रुपये असलेली पर्स ज्याची त्याला परत.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर जाधव :

कोल्हापूर - अवघं नऊ वर्ष असलेली सुष्टि प्रशांत मगदूम (सध्या रा.सुर्वेनगर कोल्हापूर ,मुळगाव कागल तालुक्यातील हळदी.)ही आपल्या नातेवाईकांच्या सोबत रविवार (ता.19) रोजी आंबा घाट येथे फिरण्यासाठी गेली होती.त्यावेळी तेथे जवळच पडलेल्या पर्सकडे तिचे लक्ष गेले,  तिने ती पर्स घेऊन आपल्या आईच्या हातात दिले असता ती पर्स उघडून पाहिली असता त्यात सोन्याचे दागिने आणि 27 हजार रुपयांची रोकड मिळाली.ती पर्स ज्याची आहे त्याला परत देण्यासाठी सुष्टिने वडीलांच्याकडे हट्ट धरला.वडीलांनी आपल्या पोलिस मित्रांच्या मदतीने करवीर उपअधीक्षक कार्यालयात संपर्क साधून सांगली येथे पंचशील नगरात रहात असलेली नजमा दिलदार अत्तार यांची असल्याचे समजले.त्यांच्याशी संपर्क साधून सोमवारी (ता.20) रोजी सकाळी सात तोळे दागिन्यांसह 27 हजार रुपये असलेली पर्स परत केली.नजमा यांनी आंबा घाटात फोटो काढ़ताना पर्स विसरली होती.

नजमा अत्तार या आपल्या नातेवाईकांसमवेत रविवारी दुपारी   आंबा घाट येथे गेल्या होत्या.तेथे गेल्यावर एका दगडावर पर्स ठेऊन फोटो काढ़त असताना पर्स तेथेच विसरून कार मध्ये बसून निघून गेल्या .त्यावेळी त्याच ठिकाणी मगदूम कुंटुबिय तेथे पोहचले.त्या वेळी सुष्टिला ती पर्स सापडली .पर्सच्या मालकीणीचा शोध घेण्यासाठी सुष्टिच्या वडीलांनी मुंबई येथील आपला पोलिस मित्र राहुल पाटील यांना फोन केला असता त्यांनी करवीर पोलिस ठाण्यातील कॉ.योगेश कांबळे यांना या घटनेची माहिती दिली असता कांबळे यांनी ही माहिती पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांना दिली.त्यांनी ही माहिती जिल्हयातील पोलिस अधिकारी यांच्या ग्रुपमध्ये कळवली.

या वेळी दागिन्याची पर्स विसरल्याची फिर्याद नजमा अत्तार या शाहुवाडी पोलिस ठाण्यात पोहचताच सदरची पर्स ही सुर्वेनगर येथील मुलीला सापडल्याची माहिती मिळाली.दरम्यान पोलिस उपअधीक्षक क्षीरसागर यांनी नजमा अत्तार आणि  सुष्टिच्या कुंटुबियांना कार्यालयात बोलावून दागिन्यांसह रोख रक्कम असलेली पर्स परत केली.पोलिस उपअधीक्षक क्षीरसागर यांनी सुष्टिचे आणि तिच्या कुंटुबियांचे त्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून सुष्टिचे अभिनंदन करुन अत्तार कुंटुबियांनी सुष्टिला तिच्या प्रामाणिकपणा बद्दल रोख बक्षीस देऊन कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post