यवलुज येथे विवाहितेची आत्महत्या.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- पन्हाळा तालुक्यातील यवलुज येथील शुभांगी विजय लोहार (वय 38.रा यवलुज ,ता.पन्हाळा) यांनी सोमवार दि.27/05/2024 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास रहात्या घरात बेडरूममध्ये असलेल्या छताच्या पंख्याला साडीने गळफास लावून आत्महत्या केली.

हा प्रकार नातेवाईकांना समजताच त्यांना बेशुध्दावस्थेत उपचारा साठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.याची फिर्याद नितीन आनंदा सुतार (दाजी) यांनी सीपीआर पोलिस चौकीत दिली.शुभांगी यांनी घरात कोणी नसताना हा प्रकार केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.त्याचे पती यवलुज गावात वेल्ड़ींगचे काम करतात.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चोकीत झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post