दर्शनासाठी आलेल्या तरुणाचा पंचगंगेत बुडून मृत्यु.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - सोलापुरचा तरुण जोतिबाचे दर्शन घेऊन कोल्हापुरातील पंचगंगा नदीत पोहण्यासाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यु झाला.सुमित सुभाष मोरे (वय.27.रा.जुळे सोलापूर ) असे मयत झालेल्याचे नाव आहे.ही घटना रविवार (ता.5) रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की,यातील मयत सुमित हा आपल्या मित्रा सोबत जोतिबाच्या दर्शनाला आला होता.रविवारी सकाळी जोतिबाचे दर्शन घेऊन दुपारी कोल्हापुरात आले असता ऊन जास्त असल्याने सुमित पंचगंगा नदीवर येऊन पोहण्यासाठी पाण्यात उतरला .पोहताना सुमितला दम लागल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला .हा प्रकार नदीत पोहणारयांच्या लक्ष्यात येताच तेथे उपस्थित असलेल्या तरुणांनी वाचविण्याचा प्रयत्न केला.सुमितला पाण्याबाहेर काढ़ुन त्याच्या पोटात गेलेले पाणी बाहेर काढायच्या प्रयत्न केला.त्यानंतर त्याला बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा  उपचारापूर्वी मृ त्यु  झाला .

 सुमित हा विवाहित असून तो पुणे येथे जॉबला आहे.एक भाऊ असून त्याचे वडील शेती करतात. आपल्या डोळ्या समोर सुमित बुडाल्याने त्याच्या मित्राला मोठा धक्का बसला.रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन करून मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post