सैनिकाने मुलगा पाहिजे म्हणुन पत्नीचा गर्भपात केल्याने पत्नीचा मृत्यु.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर /सांगली - पहिल्या दोन मुली असल्याने आता मुलगाच पाहिजे म्हणुन जयसिंगपूर येथे गर्भलिंग चाचणी करून आताही मुलगीच असल्याने आळते गावातील सैनिक असलेला सचिन कदम यांनी कर्नाटकातील महालिंगपूर (बागलकोट) येथे पत्नी सोनाली सचिन कदम (वय 32) हिचा गर्भपातात मृत्यु झाल्याची घटना घडली.या प्रकरणी सांगली ,जयसिंगपूरसह बागलकोट जिल्ह्यांतील महालिंगपूर येथील डॉक्टरांची नावे उघडकीस आली आहेत.
सोनालीचा मृत्यु झाल्याने मृत्युच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने तेथील डॉक्टरांनी प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याने सोनालीचा मृतदेह गाडीत ठेऊन प्रमाणपत्रा साठी सांगलीत वणवण भटकत राहिले .हा प्रकार तेथील पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने उघडकीस आणला.सोनाली सचिन कदम (वय 32.रा आळते) यांचे माहेर दुधगाव असून सासर आळते (ता.हातकंणगले) आहे.आळते येथील सैनिक असलेले सचिन कदम यांच्याशी विवाह होऊन त्याना दोन मुली आहेत.सोनाली तिसर्यादा गर्भवती राहिल्याने दोन्ही कुंटुबांच्या संमतीने जयसिंगपूर येथे गर्भलिंग चाचणी करून आताही मुलगीच असल्याने कर्नाटकातील महालिंगपूर येथे गर्भपात करण्यात आला असता त्यातच सोनालीचा मृत्यु झाला.
सोनालीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सोनालीच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्याकडे प्रमाणपत्राची मागणी केली असता डॉक्टरांनी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला.या वेळी मृत्यु प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नातेवाईक सांगलीत भटकताना हा प्रकार पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने उघडकीस आला.यावेळी सोनालीच्या नातेवाईकासह सांगली पोलिसांनी जयसिंगपूर आणि मिरज येथील डॉक्टरांच्यावर गुन्हा दाखल करून महालिंगपूर येथील महिला बोगस डॉक्टराला पोलिसांनी ताब्यात घेऊन हा गुन्हा कर्नाटकातील महालिंगपूर पोलिस ठाण्यात वर्ग केला आहे.