मिसळ पे चर्चा कार्यक्रम ठेवल्याने फ़ोन वरुन धमकी दिल्याने एकावर गुन्हा दाखल.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - महावीर कॉलेजच्या पाठिमागे शिवसेनेच्या वतीने तेथील कार्यकर्ता ऋषीकेश सुरेश भद्रा (वय 26 .रा.दिप्तिज ग्रीन व्हुज अपार्टमेट ,महावीर कॉलेजच्या पाठीमागे) याला  मिसळ पे चर्चा आयोजित केल्याने राजाराम गायकवाड यांनी फोन करून कुणाला विचारुन हा कार्यक्रम केला म्हणून शिवीगाळ करत थांब तुला बघतो अशी धमकी दिल्याने ऋषीकेश याने राजाराम गायकवाड यांच्या विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी राजाराम गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला.

 अधिक माहिती अशी की,तक्रारदार आणि संशयीत एकाच भागात रहात असून ते एकमेकांचे परिचयाचे आहेत.तक्रारदार हा शिवसेनेचा कार्यकर्ता असून संशयीत कॉग्रेसचा कार्यकर्ता आहे.तक्रारदार यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने त्या परिसरात मिसळ पे चर्चा आयोजित केली होती.चर्चा चालू असताना संशयीत याने तक्रारदाला फोन करून कुणाला विचारुन हा कार्यक्रम ठेवला असे म्हणत शिवीगाळ करुन थांब तुला बघतो अशी धमकी दिल्याने शाहुपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.याचा तपास शाहुपुरी पोलिस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post