स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाची कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -एसएससी बोर्ड जवळ असलेल्या मोतीनगर परिसरात कंजारभाट वसाहतीत छापा टाकून सहा गावटी दारुच्या हातभट्या उध्दवस्त करून 52 हजार 700/ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने करुन या प्रकरणी एकासह पाच महिला (सर्व रा.मोतीनगर ,कंजारभाट वसाहत एसएससी .बोर्ड जवळ को.) यांच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की,स्थानिक गुन्हें अन्वेशनच्या पथकाला मोतीनगर येथे कंजारभाट वसाहतीत पहाटेच्या वेळी गावटी दारु होत असल्याची माहिती मिळाली असता या पथकातील पोलिसांनी रविवार दि.26/05/2024 रोजी पहाटेच्या सुमारास छापा टाकून 6 गावटी दारुच्या हातभट्या उध्दवस्त करून त्या जागीच नष्ट करून गावटी दारु तयार करण्यासाठी लागणारे 900 लि.कच्चे रसायन,180 लिं.पक्के रसायन आणि 120 लिं.तयार असलेली गावटी दारुसह इतर असा एकूण 52 हजार 700/ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,पोलिस निरीक्षक शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.