स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाची कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - पोर्ले तर्फ ठाणे येथे विकास आनंदा पाटील (वय 40. रा.पोर्ले तर्फ ठाणे ) याच्या खून प्रकरणातील फरारी असलेले मुख्य सुत्रधार युवराज शिवाजी गायकवाड (वय 34.रा.पोर्ले ) ,शरद बळवंत पाटील (वय 27.रा.पोर्ले),सोमनाथ संभाजी वरुटे ( वय 27.रा.आरे)आणि ओंकार संभाजी वरुटे (वय 25 )यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केर्ली फाटा येथे अटक करून त्यांना पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अधिक माहिती अशी की ,पोर्ले तर्फ ठाणे येथे विकास आनंदा पाटील याचा रविवार (दि.19) रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास झालेल्या मारहाणीत त्याचा खून झाला होता.हा खून त्याच गावातील आर्मीत असलेला युवराज शिवाजी पाटील यांने आपल्या साथीदारांच्या मदतीने खून करून पसार झाला होता.या प्रकरणी त्यांच्यावर पन्हाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या .या पथकाला सदरचे आरोपी युवराज शिवाजी गायकवाड आणि ओंकार वरुटे या दोघांना केर्ली फाटा येथे असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी तेथे जाऊन या दोघांना ताब्यात घेतले तर संभाजी वरुटे आणि शरद पाटील यांना त्यांच्या गावातुन ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खून केल्याचे निष्पन्न झाले.त्याना अटक करून पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.ही कारवाई पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,उपविभागीय पोलिस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर सहा.पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.