9 वर्षांच्या मुलाचा लोंखडी पाइप वरुन पडून मृत्यु.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - 9 वर्षांच्या मुलाचा पार्किंग मध्ये खेळत असताना लोखंडी पाइप वरुन पडल्याने किरण मल्लाप्पा होळी (वय 9 रा. सुतारमाळ, फुलेवाडी मुळ गाव कुल्लुर ,जि.बेळगाव) याचा मृत्यु  झाला. ही घटना  17/05/2024  रोजी सकाळी साडे आठ च्या सुमारास घडली आहे.किरण हा येथे खेळत असताना लोखंडी पाइपवरुन पडल्याने त्याच्या नातेवाईकांनी बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचार चालू असताना मृत्यु झाला.

या घटनेची फिर्याद मल्लाप्पा बसाप्पा होळी यांनी सीपीआर पोलिस चौकीत दिली आहे.यातील मयत किरण याचे वडील गेल्या काही वर्षा पासून कोल्हापुरात गंवडी काम करतात.आज क्रांतीसिंह नाना पाटील नगर परिसरात असलेल्या ओम साई पार्क मध्ये कंन्ट्रक्शनचे काम चालू असून तेथे ते गंवडी काम करतात.त्यांना दोन मुले आहेत.त्याची दोन्ही मुले पार्किंग मध्ये खेळत असताना त्यातील किरण हा लोखंडी पाइपवरुन पडला.त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याला उपचारा साठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार चालू असताना त्याचा मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post