प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर/कोगनोळी-कोगनोळी टोलनाका येथे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मतीवडे फाट्यावर झालेल्या मोटारसायकल अपघातात एक जण ठार तर एक जखमी झाला आहे.ही घटना सोमवार दि.13/05/2024 रोजी सकाळी 9 च्या सुमारास घडली आहे.प्रताप बाळू पाटील (वय 27.रा.पेंडाखळे,ता.शाहुवाडी) असे अपघातात मयत झालेल्याचे नाव आहे.तर प्रसाद नाईकवडे हा तरुण किरकोळ जखमी झाला आहे.
अधिक माहिती अशी की,प्रताप पाटील आणि प्रसाद नायकवडे हे दोघे मोटारसायकल वरुन कोल्हापूरच्या दिशेने येत होते.कोगनोळी येथील टोलनाक्या जवळ असणारयां मतीवडे फाटा येथे आले असता त्यांचा गाडीवरील ताबा सुटुन तेथे असलेल्या दुभाजकाला धडक बसली.या प्रताप पाटील यांचे डोके दुभाजकाच्या कठड्याला आपटल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागून ते गंभीर जखमी झाल्याने त्यातच त्यांचा मृत्यु झाला.तर पाठीमागे बसलेले प्रसाद नायकवडे किरकोळ जखमी झाले आहेत.त्यांना 108 रुग्णवाहिकेतुन खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी प्रताप पाटील यांचा मृत्यु झाल्याचे सांगितले.घटना स्थळी निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे एस.ए.काडगौर ,बीट हवालदार शिवप्रसाद किवडण्णावर ,पोलिस तळवार यांनी भेट दिली.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.