मतदानासाठी आलेल्या वृध्दाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यु.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -मतदानासाठी गेलेल्या उत्तरेश्वर पेठ येथे रमाबाई आंबेडकर शाळेच्या मतदान केंद्रावर महादेव श्रीपती सुतार (वय 69.रा.उत्तरेश्वर पेठ,सध्या रा.शिंगणापूर) यांचा रांगेत उभे असताना अचानक चक्कर आल्याने ते खाली कोसळले असता त्यांच्या नातेवाईकांनी आणि तेथे असलेल्या कार्यकर्त्यानी त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने  मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.या घटनेने मतदान केंद्राच्या परिसरात कार्यकर्त्याची मोठी तारांबाळ उडाली.

अधिक माहिती अशी की,महादेव सुतार मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास जवळच असलेल्या मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले होते.मतदाना साठी गर्दी असलेने रांगेत उभा होते.अचानक  त्यांना चक्कर आल्याने ते खाली कोसळले.हा प्रकार नातेवाईकांच्या लक्ष्यात येताच त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा मृत्यु झाल्याचा डॉक्टरांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post