सोनतळी येथे तीन पानी जुगार खेळणारयांच्यावर छापा टाकून रोख रक्कमेसह 2 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त.



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - सोनतळी येथे करवीर पोलिसांनी छापा टाकून तीन पानी  जुगार खेळत असलेल्या 14 जणांना ताब्यात घेऊन रोख रक्कमेसह 2 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की,करवीर पोलिसांना सोनतळी येथील भुमी मंगल कार्यालयाजवळ असलेल्या  निवास विठ्ठल पाटील यांच्या घरात तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी रविवार दि.19/05/2024 रोजी छापा टाकून निवास विठ्ठल जाधव (वय 50.रा.सोनतळी,घरमालक) चंद्रकांत यल्लापा नलवडे(वय 55.रा.केर्ले) ,महेश सुरेश वास्कर (वय 36.लक्षतीर्थ वसाहत),रमेश रामचंद्र शिपेकर(वय 33.रा.आंबेवाडी),संजय अंतु सावंत (वय 42.रा

विक्रमनगर),किशोर शंकर नाईक (वय 35.रा.केर्ली),अतुल बाबूराव चौगुले(वय.44.रा.केर्ली),किरण बाळासो आंबी (37.रा.आंबेवाडी),संजय बाळू कदम(48.रा.आंबेवाडी),राहुल रघुनाथ जाधव (45.रा.आंबेवाडी),प्रकाश चिंतु खडके(51.रा.केर्ली),किरण अरुण यादव(40.रा.वडणगे),कमलाकर रामचंद्र अष्टेकर (40.रा.लक्ष्मीपुरी)आणि योगेश आनंदराव कवठेकर (35.रा.प्र.चिखली) या 14 जणांच्यावर करवीर पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून त्यांच्या कडील 53 हजार 800/रुपये रोख,67 हजार 500 रु.किंमतीचे 13 मोबाईल यांच्यासह 1 लाख 45 हजार रुपये किमंतीच्या 5 मोटारसायकली असा एकूण 2 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अधिक तपास सहा.पोलिस निरीक्षक संजय बोंबले हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post