प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - जुनी मोरे कॉलनी येथे पाणी पिण्याच्या निमित्ताने आलेल्या एका अनोळखी महिलेने दीड तोळ्याची बोरमाळ लंपास केल्याची घटना घडली.याची फिर्याद कमल बाळासाहेब गायकवाड (वय 56.) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली.हा प्रकार गुरुवार (दि.23) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडला.
यातील फिर्यादी कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या.त्या वेळी एका अनोळखी महिला घरी येऊन त्यांच्या पतीकडे पिण्यासाठी पाणी मागीतले असता त्यांना बसल्या जागेवरून उठता येत नसल्याने त्यांनी सदर महिलेस स्वयंपाक घरात जाऊन पाणी घेण्यास सांगितले असता या संशयीत महिलेने ड़ब्यातील बोरमाळसह रोख रक्कम लंपास केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.अधिक तपास पोलिस करीत आहेत